breaking-newsराष्ट्रिय

नोएडामध्ये दोन बांगलादेशी दहशतवादी पकडले

नोएडा – उत्तर प्रदेशातील दहशतवादी विरोधी पथकाने पश्‍चिम बंगाल पोलिसांच्या संयुक्‍त कारवाईमध्ये बांगलादेशातील दोघा दहशतवाद्यांना ग्रेटर नोएडामध्ये अटक करण्यात आली. मुशर्रफ उर्फ मुसा आणि रुबेल अहमद असे अटक झालेल्या दोघांची नावे असून हे दोघेही बांगलादेशातील “जमाल उल मुजाहिदीन बांगलादेश’ (जेएमबी) या संघटनेचे सदस्य आहेत, असे पोलिस महासंचालक ओ.पी. सिंह यांनी पत्रकारांना सांगितले. ग्रेटर नोएडामधील सुरजपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून या दोघांना अटक करण्यात आली आणि चौकशीसाठी उत्तर प्रदेश “एटीएस’च्या कार्यालयात नेण्यात आले.

“जेएमबी’चे दोघे सदस्य राजधानी दिल्लीच्या परिसरामध्ये मोठा घातपात घडवण्याच्या प्रयत्नात आहेत. दिल्लीच्या परिसरातून “जेएमबी’साठी पैशाची व्यवस्थाही केली जात असल्याबद्दलची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्याच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या दोघांच्या चौकशीतून या कटाबाबतची अधिक माहिती मिळू शकेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

“जेएमबी’ची स्थापना 1998 साली शेख अब्दुर रेहमान याने केली. या संघटनेने बांगलादेशभरात एकाचवेळी 500 बॉम्बस्फोट घडवून आणले होते. त्यानंतर या संघटनेवर 2005 साली बंदी घालण्यात आली होती.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने बांगलादेशातील “अन्सुल्ला बांगला टीम’ (एबीटी) या आणखी एका कट्टरवादी संघटनेच्या तिघाजणांना अटक केली होती. हावडा अमृतसर रेल्वेमध्ये चढत असतानाच त्यांना ताब्यात घेतले गेले होते. चौकशीदरम्यान त्यांच्याकडे बनावट आधार कार्डही आढळून आले होते. बांगलादेशमध्ये निधर्मीवाद्यांच्या हत्या प्रकरणांमध्ये “एबीटी’ या संघटनेचा हात होता. “अल कायदा’पासून प्रेरणा घेऊन बांगलादेशात घातपाती कारवाया करणारा हा गट आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button