breaking-newsराष्ट्रिय

पाकिस्तानमध्ये मतदानादरम्यान बॉम्बस्फोट; १५ जणांचा मृत्यू तर २० जखमी

नवी दिल्ली – पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र मतदानादरम्यान बलुचिस्तानमधील क्वेट्टा येथे बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त मिळत आहे. यामध्ये १५ जणांचा मृत्यू तर २० पेक्षा अधिक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

स्थानिक माध्यामाच्या वृत्तानुसार, क्वेट्टामध्ये सकाळी जवळपास ११ वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागातून हिंसाचाराच्या घटना घडत असल्याची माहिती मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button