breaking-newsटेक -तंत्रव्यापार

Honda Hornet 2.0: होंडाची दमदार ‘हॉर्नेट 2.0’ बाईक भारतात लॉन्च

होंडा मोटरसायकल अ‍ॅन्ड स्कूटर इंडिया कंपनीने भारतात नवीन ‘हॉर्नेट 2.0’ ही बाईक लॉन्च केली आहे. दणकट, स्पोर्टी आणि अत्याधुनिक हॉर्नेट 2.0 द्वारे 180 व 200 सीसी बाईक क्षेत्रात पदार्पण केले आहे. आंतरराष्ट्रीय स्ट्रीट फायटर या संकल्पनेसह विकसित करण्यात आलेली ही मोटारसायकल अतिशय चपळ असून त्याला डिझाइन कोड्समधील अत्याधुनिक वैशिष्ट्यांची जोड देण्यात आली आहे.

होंडाच्या या बाईकची फ्यूल टँक कॅपिसिटी 12 लीटर आहे. नवीन हॉर्नेट 2.0 मोटरसायकल पर्ल इग्निअस, मॅट सॅन्ग्रिया रेड मॅटेलिक, मॅट एक्सिस ग्रे मॅटेलिक आणि मॅट मार्वेल ब्लू मॅटेलिक या 4 कलर ऑप्शन मध्ये आहे. होंडा आपल्या या बाईकवर 6 वर्षाची वॉरंट पॅकेज (3 वर्ष स्टँडर्ड प्लस, 3 वर्ष ऑप्शनल स्टँडर्ड वॉरंटी) देत आहे.

हॉर्नेट 2.0 ची काय आहेत वैशिष्ट्ये ?

– बाइकमध्ये हॉर्नेट 2.0 साठी शार्प बॉडी कट्स आणि चंकी गोल्डन यूएसडी फोर्क मोटर सायकलला स्पोर्टी लूक देतात.

– पुढील बाजूल ऑल-एलईडी सेटअप दिला असून ज्यामध्ये हेडलॅम्प, टेल लॅम्प आणि इंडिकेटरचा समावेश आहे.

– बाईकमध्ये एक ब्लू-बॅकलिट डिजिटल कन्सोल सुद्धा मिळणार आहे. जो ओडोमीटर, ट्रिप मीटर, गिअर पोझिशन इंडिकेटर, एक क्लॉक आणि इंधन गेज सारखी माहिती दिसून येते.

– बाईकला पॉवर देण्यासाठी 184cc चे HET PGM-FI सिंगल सिलिंडर युक्त एअर-कुल्ड इंजिन दिले आहे. जे 17.27ps ची पॉवर आणि 16.1Nm चा टॉर्क जनरेट करणार आहे.

-टीवीएस अपाचे आरटीआर 200 4V आणि बजाज पल्सर एनएस 200 च्या तुलनेत हॉर्नेटची पॉवर कमी आहे. इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्स लैस असून जे 11.25 सेकंदात 200 मीटर पर्यंत अंतर कापण्याची क्षमता आहे.

– गोल्डन यूएसडी फ्रंट फोर्क्स (200 सीसी सेगमेंट), निगेटिव्ह लिक्विड क्रिस्टल मीटरसह डिजिटल इंस्ट्रुमेंट कंसोल, 276 मिमी आणि 220 मिमीचे पॅटल डिस्क ब्रेक, सिंगल चॅनस एबीएस, इंजिन किल स्विच, वायडर ट्युबलेस टायर, हॅजार्ड स्विच

कंपनीकडून या बाईकची किंमत 1.26 लाख रुपये ठरवण्यात आली असल्याची माहिती आहे. कंपनीने अधिकृत वेबसाइट आणि याच्या अधिकृत डिलरशीप्समध्ये ‘हॉर्नेट 2.0’ बाईकची बुकिंग आधीच सुरू केली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात नवीन बाईकची डिलिव्हरी सुरू होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button