breaking-newsपिंपरी / चिंचवड

नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये योगादिन साजरा

पिंपरी, (महाईन्यूज) – चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुक्रवारी (दि. २१) योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे व प्राचार्या डॉ. कांचन देशपांडे यांनी योगासने केली.

यावेळी अमित गोरखे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्व समजावून सांगितले. ते म्हणाले की, योगा ही संपूर्ण जगाला भारताने दिलेली देण आहे. योगासनामुळे शरीर व मनाला चैतन्यमय स्फूर्ती मिळते. त्यामुळे रोज किमान ११ तरी सूर्य नमस्कार घालावेत.

यावेळी विद्यार्थ्यांबरोबर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा योगासने केली. यावेळी शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख महेश नलावडे, शिक्षिका मोनिका जगदाळे यांनीही मुलांकडून विविध आसने करून घेतली. यामध्ये सूर्यनमस्कार, वज्रासन, ताडासन, पद्मासन ही सर्व आसने मुलांकडून करून घेतली. मुलांनीही सर्व योगासने अतिशय उत्साहात केली.

यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे, शाळेचे कार्यकारी संचालक विलास जेऊरकर, शाळेच्या प्राचार्या डॉ. कांचन देशपांडे, शाळेच्या विश्वस्थ डॉ. प्रिया गोरखे, तांत्रिक व्यवस्थापक समीर जेउरकर हे उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button