breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

‘जिओ’चा मोफत सेवेचा वायदा फोल!

आयुष्यभर मोफत सेवा पुरविण्याचा वायदा करणाऱ्या रिलायन्सच्या ‘जिओ’ या मोबाइल कंपनीने अन्य मोबाइल कंपन्यांना करण्यात येणाऱ्या प्रत्येक कॉलवर सहा पैसे प्रतिमिनिट शुल्क आकारण्याचे जाहीर केल्याने आपल्याच वायद्यापासून ‘जिओ’ने फारकत घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ग्राहकांसाठी जिओने १०, २०, ५० आणि १०० रुपयांच्या योजना आणून त्यावर काही मिनिटे, तसेच इंटरनेट सेवा मोफत देण्याचे जाहीर केले आहे. मात्र प्रतिमिनिट सहा पैसे शुल्क आकारण्यात येणार असल्यामुळे प्रत्यक्षात त्यावरील १८ टक्के वस्तू व सेवा कर गृहीत धरल्यास ७.०८ पैसे प्रतिमिनिट दर आकारला जाणार आहे. त्यामुळे ही ग्राहकांची फसवणूक असल्याचा आरोप केला जात आहे. एकीकडे ‘जिओ’वरून अन्य कंपन्यांच्या नेटवर्कवर केल्या जाणाऱ्या कॉलवर ‘इंटरकनेक्ट युसेज चार्ज’ (आययूसी) घेतला जात आहे. त्याच वेळी ‘जिओ’ला अन्य कंपन्यांकडून मिळणाऱ्या या शुल्काचा लाभ ग्राहकांना दिला जात नाही. ही रक्कम कोटय़वधी रुपयांच्या घरात असल्याचा दावा आहे.

एमटीएनएल डॉल्फिनच्या सेवेसाठी असा आकार घेतला जात नाही. मात्र जिओ सेवेच्या कुठल्याही प्रकारच्या सेवेसाठी असा आकार आता १० ऑक्टोबरपासून घेतला जाणार आहे. व्होडाफोन, एअरटेल, आयडिया या मोबाइल कंपन्याही असा आकार घेत नाही, असा दावाही केला जात आहे. मात्र हा दावा फोल असल्याचा दावा ‘जिओ’ सेवेच्या प्रवक्त्याने केला आहे. असे शुल्क सर्वच कंपन्या घेतात. हे शुल्क संपूर्णपणे रद्द करावे, असा आग्रह जिओनेच धरला होता. मात्र त्यास इतर कंपन्यांनी विरोध केला. त्या कंपन्या छुपेपणे असे शुल्क आकारत असल्याचेही प्रवक्त्याने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button