breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

नेटफ्लिक्स करणार भारतात तीन हजार कोटींची गुंतवणूक

मुंबई | नेटफ्लिक्सने भारतात तीन हजार कोटींची गुंतवणूक कऱण्याचं ठरवले. भारतीय कार्यक्रमांना जगभरात मागणी असल्याचं कंपनीच्या लक्षात आलंय. लैला, सेक्रेड गेम्स या सीरीजना जगभरात तुफान प्रतिसाद मिळाला, अशी माहिती कंपनीचे सीईओ रीड हेस्टिंग्जने दिली.

तसेच माईटी लिटील भीम ही कार्टून मालिका ब्राझिल, कॅनडा तसंच अन्य देशात पाहिली जातेय.भारतामध्ये ऑनलाईन स्ट्रिमिंग अॅप्सची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नेटफ्लिक्स, हॉटस्टार, अॅमेझॉन प्राइम यासारखे विविध पर्याय सध्या भारतीय युजर्सकडे उपलब्ध आहेत. त्यापैकी नेटफ्लिक्सची भारतातील लोकप्रियता जास्त आहे. त्यामुळेच आगामी काळात नेटफ्लिक्सने तीन हजार कोटींची गुंतवणूक कऱण्याचा निर्णय घेतला आहे.नेटफ्लिक्स आगामी काळात प्रादेशिक भाषांवर लक्ष्य केंद्रीत करणार आहे. यापूर्वीच नेटफ्लिक्सने काही मराठी चित्रपट आणि वेबसिरीज उपलब्ध करुन दिले आहेत. मात्र, यापुढे नेटफ्लिक्स स्वतः चित्रपट आणि वेबसिरीजची निर्मिती करणार आहेत. नेटफ्लिक्सवरील कंटेन्ट तरुणाईमध्ये जास्त लोकप्रिय आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button