breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सफाई कर्मचार्‍यांना स्वाइन फ्लूची लस मोफत द्या

पिंपरी – शहरात स्वाइन फ्लूचा धोका निर्माण झाला आहे. स्वाइन फ्लूने मृत्यू होणार्‍यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी दररोज वेगवेगळी स्वच्छतेची कामे करतात. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी महापालिकेतर्फे पाऊल उचलणे गरजेचे आहे. सफाई कर्मचार्‍यांना स्वाइन फ्लूची लस मोफत द्यावी, अशी मागणी आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. सागर चरण यांनी केली. आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना याबाबत निवेदन दिले.

निवेदनात नमूद करण्यात आले की, महापालिकेतर्फे स्वाइन फ्लूवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लस देण्याची व्यवस्था केली आहे. आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेची दक्षता घेण्यात येत असून मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी साथीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जानेवारीपासून आजपर्यंत 228 जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. त्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या वातावरणात वारंवार बदल होत आहे. या वातावरणात स्वाइन फ्ल्यू आणखी सक्रिय होण्याची शक्यता आहे.

स्वाइन फ्ल्यूचे जीवाणू अशा वातावरणात साधारणतः 48 तास जिवंत राहतो. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाचे कर्मचारी जीव धोक्यात घालून स्वच्छतेची कामे करतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी महापालिकेकडून सफाई कामगारांसाठी आरोग्य शिबिर, कोपरा सभा, भित्तीपत्रके असे उपक्रम राबवावे. महापालिकेकडून सफाई कामगारांना सुरक्षा साधने द्यावीत. तसेच कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी महापालिकेतर्फे सफाई कर्मचार्‍यांना स्वाईन फ्ल्यूची लस मोफत द्यावी, अशी मागणी या वेळी चरण यांनी निवेदनाद्वारे केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button