breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निवडणूक निकाल पाहताच राज ठाकरे यांनी दिली प्रतिक्रिया

मुंबई- देशभरासह राज्यभरात काँग्रेस-राष्ट्रवादीचे बहुतेक उमेदवार पराभवाच्या छायेत आहेत. तर सेना-भाजपाच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी निर्णायक आघाडी मिळवली आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी सभा घेऊनही त्यांच्या उमेदवारांना यश मिळालेलं नाही. त्यानंतर आता राज ठाकरेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीतील निकाल हा अनाकलनीय असल्याचं राज ठाकरेंनी ट्विट करत म्हटलं आहे. राज ठाकरेंची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान साधत राज्यभरात सभा घेणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभांचा फारसा परिणाम झाल्याचं दिसलं नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button