breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिलरच्या निकृष्ट कामामुळे महामेट्रो वरिष्ठ अधिकारी हडबडले 

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  कासारवाडी येथील पिलर क्रमांक २५१ येथे मेट्रोचा कॉलम भरलेला आहे. या कॉलमचे अतिशय धोकादायक पध्दतीने व अर्धवट स्थितीत कॉक्रीटीकरण झाल्याचा प्रकार उघड झाला. या एका पिलरच्या निकृष्ट कामावरून महामेट्रो व्यवस्थापन अधिकारी हडबडले आहे. महामेट्रो व्यवस्थापनाकडून सारवासारवा उत्तरे दिली जात होती.
सोमवारी मेट्रोच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला महामेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक गौतम बिऱ्हाडे, गुणवत्ता व दर्जा विभागाचे उपमहाव्यवस्थापक  के. सी. त्यागी, महाव्यवस्थापक डॉ. हेमंत सोनवणे आदी उपस्थित होते.
गौतम बिऱ्हाडे यांनी खुलासा करता म्हटले की, मेट्रोच्या कामात दर्जाबाबत संपुर्ण खबरदारी घेतली जात आहे. आतापर्यत दीडशे पिलर झाले. त्यापैकी या एका पिलरच्या कामाचा हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी वैभव भट व चैतन्य कुमार या दोन अभियंत्याचे निलंबन करण्यात आले आहे. अल्ट्रासॉ़निक पल्स व्हेलॉसिटी, रिबाउंडर हॅमर आणि क्रॉकीट कोअर या चाचण्या तज्ज्ञामार्फत  केल्या जाणार आहेत. चाचण्या पूर्ण झाल्यानंतर पिलर निकृष्ट असल्यास तेथे दुसरा पिलर बांधला जाईल. सुरक्षा, दर्जा आणि गुणवत्ता याबाबत कुठलेही तडजोड केली जाणार नाही. सर्व अधिकाऱ्यांना तशी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी हा पिलरच्या कामात हा दोष असल्याचे महिनाभरापूर्वी निदर्शनास आले होते. त्यानंतर ठेकेदार कंपनीला जाब विचारल्याचेही बिऱ्हाडे म्हणाले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button