breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

१० वी १२ वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी! जाणून घ्या कधी लागणार निकाल?

SSC and HSC Result 2024 Date | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच उच्च माध्यमिकच्या परीक्षेचा म्हणजेच इयत्ता १२वीच्या आणि माध्यमिकच्या परीक्षेचा म्हणजेच १०वीचा निकाल जाहीर करणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी mahresult.nic.in आणि mahahsscboard.in वर निकाल पाहू शकतात. १० वी आणि १२ वीचा निकाल पाहताना विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्र इयत्ता १२ वी २०२४ चा निकाल में २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये बदलही होऊ शकतो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावी २०२४ च्या कॉमर्स, आर्टस आणि सायन्स या विषयांचा निकाल जाहीर करेल. महामंडळाकडून निकालाची तारीख अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाही. सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, निवडणुकांचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. त्याअगोदर दहावीचा निकाल लावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे १, २ आणि ३ जून यापैकी एका तारखेला निकाल जाहीर होऊ शकतो.

हेही वाचा    –    ‘खासदार बारणेंनी काम केले नाही म्हणणाऱ्या विरोधकांना मतदारसंघच माहीत नाही’; महेंद्र थोरवे 

निकाल पाहण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

  • प्रथम अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या.
  • यानंतर होमपेजवरील Maharashtra SSC and HSC result साठी लिंकवर क्लिक करा.
  • आता तुमचा सीट नंबरआणि जन्म तारीख किंवा आईचे नाव टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
  • यानंतर Maharashtra board 10th and 12th results 2024 चा निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसेल.
  • यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button