breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरीत भाजप कार्यालयासमोर बारणेंच्या विजयाचा जल्लोष 

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी मोरवाडीतील भाजप कार्यालयासमोर मावळ लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा विजयी जल्लोष साजरा करण्यात आला.  पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांना भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, मावळ लोकसभा निवडणुकीत महायुतीला भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळवल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाच्या घोषणा देतानाच कार्यकर्त्यांनी मोरवाडीतील भाजपच्या पक्ष कार्यालयात साखर-पेढे वाटले. फटाक्यांची जोरदार आतषबाजी  करण्यात आली.
??
पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, महापालिकेचे सत्तारूढ़ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीचे सभापती  विलास मडिगेरी, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, नगरसेवक शितल शिंदे, नामदेव ढाके, कैलास ( बाबा) बारणे, चंद्रकांत नखाते, बाबू नायर, नगरसेविका शर्मिला बाबर, कमल घोलप, संघटन सरचिटणीस प्रमोद निसळ, सरचिटणीस अमोल थोरात, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे स्वीकृत नगरसदस्य विनोद तापकीर, राजेश पिल्ले, रामकृष्ण राणे, राजू दुर्गे, शेखर चिंचवडे, पोपट हजारे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button