ताज्या घडामोडी

निवडणूक आयोगाच्या विरोधात पिंपरीत शरद पवार गटाच्या वतीने निदर्शने

पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्हाच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर सरकार व निवडणूक आयोग यांच्या विरोधात पिंपरी-चिंचवड शहर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जोरदार निदर्शने केली.
युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने यावेळी “महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार, आले शंभर गेले शंभर शरद पवार एक नंबर, आमचा पक्ष आमचे चिन्ह शरद पवार शरद पवार” या जोरदार घोषणा देण्यात आल्या.
यावेळी युवक शहराध्यक्ष इमरान शेख, महिला शहराध्यक्ष ज्योतीताई निंबाळकर, युवक कार्याध्यक्ष सागर तापकीर, प्रवक्ते माधव पाटील, भोसरी विधानसभा अध्यक्ष संतोष शिंदे,वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप, महिला उपाध्यक्ष रेखा मोरे, जिल्हा सरचिटणीस मेघराज लोखंडे, शहर संघटक अश्रफ शेख, राजेश हरगुडे, नितीन मोरे, सचिन शिंदे, हाजी मलंग शेख, समाधान आचलखांब, तनवीर अहमद, पियुष अंकुश, साहिल वाघमारे,मयूर खरात,उमेश धोत्रे आणि मोठ्या संख्येने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी  उपस्थित होते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button