breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

शरद पवार गटाच्या नव्या राजकीय पक्षाच ‘हे’ असेल नाव

EC Decision on NCP :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हक्क कुणाचा? यासाठी दोन्ही गटांनी निवडणूक आयोगात धाव घेतली होती. बरेच महिने सुनावणी चालली. अखेर निवडणूक आयोगाने विधिमंडळातील संख्याबळ पाहता अजित पवारांच्या बाजूने निर्णय दिला. त्यामुळे शरद पवार यांच्यासमोर आता मोठ आव्हान उभ राहिलं आहे. त्याने नव्याने सगळी बांधणी करावी लागणार आहे. शरद पवार यांचा मानणारा सुद्धा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. शरद पवार यांना नव्याने नेते आणि कार्यकर्त्यांची फळी उभारावी लागेल.

केंद्रीय निवडणूक आयोगाने काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निकाल दिला. हा निकाल शरद पवार गटासाठी मोठा झटका आहे. लोकसभा निवडणुकीला काही महिने उरले असताना हा निकाल आला. शरद पवारांनी स्थापना केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या हातातून गेलाय. त्यांचे पुतणे अजित पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाने अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिली. मागच्यावर्षी जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली होती. बहुसंख्य आमदारांचा मोठा गट अजित पवारांसोबत शिवसेना-भाजपा महायुती सरकारमध्ये सहभागी झाला. शरद पवार गटाने मात्र विरोधी पक्षात राहण्याची भूमिका कायम घेतली होती.

हेही वाचा – पुण्यातून EVM बाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका

निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला आज दुपारपर्यंत पक्षासाठी नवीन नाव आणि चिन्ह सुचवायला सांगितलं आहे. शरद पवार गटाला दुपारपर्यंत पक्षासाठी नवीन नाव आणि चिन्ह काय असेल? त्या बाबत कळवाव लागणार आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार’ हे नाव नव्या पक्षाच असू शकतं. त्याचवेळी ‘उगवता सूर्य’ या चिन्हासाठी पवार गट अर्ज करु शकतो. ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार’ यात सीनियर पवारांच नाव आहे. त्याचा मोठा राजकीय लाभ होईल असं पवार गटातील नेत्यांना वाटतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button