breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

शहरातील ओबीसी बांधवांना आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला: सचिन चिखले

महापालिका निवडणुकीत सर्वच जागांवर मनसे उमेदवार देणार 

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुक २०२२ करिता आज अंतिम आरक्षण सोडत जाहिर झाली आहे. शहरातील ओबीसी बांधवांना आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असल्याचे सांगत येणाऱ्या महापालिका निवडणुकीत सर्वच जागांवर मनसे उमेदवार देणार असून पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी म्हटले आहे.

आरक्षण सोडतीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने सचिन चिखले यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात चिखले यांनी म्हटले आहे की, आगामी निवडणुकीसाठी शहरातील ओबीसी बांधवांना आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठीची आरक्षण सोडत काढण्यात पालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने अत्यंत आनंदी वातावरणात कामकाज पार पडले. त्याबद्दल ओबीसी बांधव आणि महापालिका अधिकारी व कर्मचारी यांचे मनसेच्या वतीने अभिनंदन तसेच ओबीसी बांधवांना खूप खूप शुभेच्छा.

ओबीसी आरक्षणासह आगामी निवडणुका घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुरूवातीपासूनच आग्रही होती.. आहे.. आणि राहणार.. आज आरक्षण जाहीर झाल्यामुळे पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदार संघातील ओबीसी बांधवांना देखील आपल्यासोबत निवडणूक लढवण्याचा स्वतंत्र हक्क मिळाल्याचा आनंद आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणा-या पालिका निवडणुकीत आरक्षित सर्वच जागांवर उमेदवार देणार आहे. त्यामुळे आपल्याला ताकदीने निवडणूक लढवायची आहे. त्यासाठी महापालिकेच्या एकूण ४६ प्रभागांमध्ये मनसे ताकदीचे उमेदवार उभे करणार आहे. तरी, पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी येणा-या काळात जोमाने कामाला लागायचे आहे असे देखील सचिन चिखले यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button