breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

निर्भया प्रकरण- दोषींविरोधात तिसऱ्यांदा डेथ वॉरंट जारी…३ मार्चला सकाळी ६ वाजता देण्यात येणार फाशी…

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींविरोधात आता तिसऱ्यांदा डेथ वॉरंट जारी केले आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने दोषींना ३ मार्चला सकाळी ६ वाजता फाशी देण्याचे आदेश दिले आहेत. निर्भयाच्या कुटुंबीयांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी केली…न्यायालयाच्या या निर्णयानंतर निर्भयाची आई आशादेवी यांनी समाधान व्यक्त केले.

निर्भयाची आई आशादेवी म्हणाल्या की, मला आशा आहे की आता ३ मार्च ही अंतिम तारीख असेल. त्याचदिवशी गुन्हेगारांना फाशी दिली जाईल. ‘देर है पर अंधेर नही’, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. हे सांगताना मागीलवेळेप्रमाणे त्यांच्या चेह-यावर आनंद दिसून आला नाही. मी खूप संघर्ष केला आहे. माझ्या मुलीला न्याय मिळेल, अशी आता मला अपेक्षा आहे. 

दोषींच्या वकिलांनी त्यांच्याकडे अक्षयसाठी नव्या दया याचिकेचा पर्याय असल्याचे म्हटले. पवनकडेही क्यूरेटिव्ह पिटिशन आणि राष्ट्रपतीकडील दया याचिकेचा पर्याय उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.त्यामुळे आता आरोपींना 3 मार्चला फाशी होते की ही तारिख सुद्धा पुढे ढकलण्यात आरोपींच्या वकिलांना यश मिळणार हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button