त्रिपुरात 24 संशयित दहशतवाद्यांना अटक
आगरतळा – त्रिपुरात 24 बांगलादेशी युवकांना दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. आगरतळा रेल्वे स्थानकावर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्या सर्वांकडेच बनावट आधार कार्डे सापडली आहेत. त्यांची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून नॅशनल इन्व्हेस्टीगेटिंग एजन्सीचे पथक उद्या आगरतळा येथे येणार आहे. हे संशयीत युवक दिल्लीहूनन त्रिपुरा सुंदरी एक्स्प्रेसनने आगरतळा येथे आले होते. त्यांच्या विषयीची माहिती गुप्तचर सूत्रांनी दिल्यानंतर त्रिपुरा पोलिसांच्या मोबाईल टास्क फोर्सने त्यांना ताब्यात घेतले.
या संशयितांनी आपण उत्तरप्रदेश, दिल्ली आणि पश्चिम बंगालचे रहिवासी असल्याचे तपास अधिकाऱ्यांना सांगितले पण ते बांगलादेशी असल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यांच्यापैकी तिघांकडे बांगलादेशचे पासपोर्ट सापडले आहेत पण त्यांची मुदत मागेच संपली असल्याचेही आढळून आले आहे.