breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

कोरोनाचा उपाय: कोरोनाची मूर्ती तयार करून मूर्तीपुढे माफी मागावी- स्वामी चक्रपाणी…

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे संपूर्ण चीनसह जगातील इतर देशांमध्ये सध्या भितीचे वातावरण आहे. पण कोरोना हा विषाणू नसून, मांसाहार करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी घेतलेला अवतार असल्याचे हिंदू महासभेने म्हटले आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी हे वक्तव्य केले आहे.

जगातील जास्तीत जास्त लोकांनी शाकाहाराकडे वळावे. मांसाहार करणे बंद करावे, म्हणूनच हा अवतार घेण्यात आला आहे. यावर कोणाचा विश्वास बसू दे किंवा न बसू दे पण हे वास्तव आहे, असे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे ज्या चीनमध्ये या विषाणूचा सर्वाधिक फैलाव झाला आहे. त्या देशाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी आपल्याकडे मार्गही असल्याचे स्वामी चक्रपाणी यांनी सांगितले.

स्वामी चक्रपाणी यांनी म्हटले आहे की, या आजारातून मुक्ती मिळवण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी कोरोनाची मूर्ती तयार करावी आणि या मूर्तीपुढे माफी मागावी. त्याचबरोबर देशातील कोणत्याही जीवाला यापुढे कधीही त्रास देणार नाही, असे या मूर्तीपुढे सांगावे. जर चीनमधील लोकांनी आणि क्षी जिनपिंग यांनी आपले म्हणणे ऐकले तर हा कोरोना अवतार परत जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button