breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

नियम डावलून मुख्यमंत्र्याच्या सभेला परवानगी देवू नये, अन्यथा राष्ट्रवादी करणार आंदोलन

– आयुक्त श्रावण हर्डिकर यांना विरोधी पक्षनेत्यांचा इशारा

पिंपरी ( महा ई न्यूज ) – निगडी प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदान खेळाडूंना खेळासाठी राखीव ठेवलेले आहे. त्या मैदानावर मुख्यमंत्र्याच्या राजकीय सभेला परवानगी देण्यात येवू नये, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे. मात्र, नियम डावलून महापालिकेच्या आयुक्तांनी सभेला परवानगी दिल्यास राष्ट्रवादी कॅाग्रेसकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

भाजपने मावळ व शिरुर लोकसभा मतदार संघात वातावरण निर्मितीसाठी निगडीतील मदनलाल धिंग्रा मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या (शनिवार दि. ३) उपस्थितीत प्रचार सभा होणार आहे. त्या मैदानावर राजकीय सभा घेण्यास सामाजिक कार्यकर्त्यासह राष्ट्रवादीने विरोध दर्शविला आहे.

याबाबत दत्ता साने यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीची सत्ता असताना मदनलाल धिंग्रा मैदानासाठी करोडो रुपये खर्च करुन शहरातील खेळाडूंसाठी खेळाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या अद्ययावत सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. महागडी हिरवळ, मैदानाचे सपाटीकरण, अत्याधुनिक दिवे, मैदानासाठी स्प्रिंक्लर सिस्टिम इत्यादी अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. या मैदानावर परीसरातील व शहरातील होतकरु खेळाडू नित्य सराव करीत असतात. त्यातच दिवाळीच्या सुट्ट्या देखील लागणार आहेत. सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांना खेळायला मैदान खुले असणे आवश्यक बाब आहे. या ठिकाणी जर सभा घेण्यात आली तर महापालिकेने आतापर्यंत या मैदानावर खर्च केलेले करोडो रुपये वाया जाणार आहेत,मनपाचे आर्थिक नुकसान होणार आहे. तसेच मैदानावरील पुरविण्यात आलेल्या अत्याधुनिक सुविधा खराब होण्याची शक्यता आहे. तसेच मैदान व मैदानावरील हिरवळही खराब होऊन खेळांडूंना हे मैदान वापरता येणार नाही. तरीही भाजपच्या पदाधिका-यांनी या मैदानावर मेळावा घेण्याचे नियोजन केले आहे. वास्तविक या मैदानावर लाखो लोक आल्यास पार्कींगचा प्रश्न उद्भवणार आहे. लोकांना ही जागा बसायला पुरणार नाही. यामध्ये एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला आहे.

तसेच शहरातील खेळाडूंचे व विद्यार्थ्याचे हित लक्षात घेऊन मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शनिवार दि. ३ नोव्हेंबर रोजी होणा-या लोकसभा निवडणूक प्रचाराच्या सभेस परवानगी देण्यात येऊ नये. अन्यथा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षामार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button