breaking-newsपिंपरी / चिंचवड

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा दणका, 399 पोलिसांच्या बदल्या

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच महिन्यात शहर पोलीस दलातील 399 पोलिसांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामुळे एकाच पोलीस ठाण्यात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या प्रस्थापित पोलिसांचे धाबे दणाणले आहेत.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची 2 सप्टेंबर रोजी पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यांनी 5 सप्टेंबर रोजी आयुक्त पदाची सूत्रे तत्कालीन पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडून घेतली. आयुक्त पदाची सूत्रे घेतल्यानंतर एका महिन्याच्या आतच आयुक्तांनी शहर पोलीस दलातील 399 पोलिसांच्या बदल्या केल्या.

सोमवारी याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत. सहाय्यक फौजदार (13), पोलीस हवालदार (122), पोलीस नाईक (157), पोलीस शिपाई (107) अशा एकूण 399 पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यातील काही पोलीस एकाच पोलीस ठाण्यात मागील काही वर्षांपासून ठाण मांडून बसले होते. त्या प्रस्थापितांना बदल्यांमुळे चांगलाच धक्का बसला आहे. पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा, वाहतूक विभाग आणि मुख्यालयातील पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button