breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

#CoronaVirus: आबांच्या घरात कोरोनाचा शिरकाव, पुत्र रोहित पाटील यांच्यासह दोघे बाधित

सांगली: राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आर. आर. आबा यांचे सुपुत्र रोहित पाटील आणि बंधू सुरेश पाटील या दोघांच्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सुदैवाने आबांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या पलुस कडेगाव मतदारसंघातील आमदार सुमन पाटील यांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. सुरेश पाटील आणि रोहित पाटील या दोघांचे अहवाल गुरुवारी दुपारी मिळाले. त्यानंतर दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दोघांची प्रकृती ठीक असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. आमदार सुमनताई पाटील यांचीही स्वॅब तपासणी केली होती, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. तासगावमध्ये बुधवारी झालेल्या कोव्हिड उपचार केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमात रोहित पाटील सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजय पाटीलही हजर होते. त्यामुळे संपर्कात आलेल्या व्यक्तींनी वैद्यकीय तपासणी करावी, असे आवाहन रोहित पाटील यांनी केलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button