breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘जनता कर्फ्यू’ला देशभरातून उत्फुर्त प्रतिसाद, जागोजागी टाळी-थाळी अन् घंटानाद

देशात वेगानं पसरत चाललेल्या कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजे रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी कोरोनाशी लढा देण्यासाठी दिवसरात्र काम करणाऱ्यांचे संध्याकाळी 4,5 वाजण्याच्या दरम्यान टाळी-थाळी आणि घंटानाद करुन आभार मानावे, असे आवाहन जनतेला केले होते. मोदींनी केलेल्या याच आवाहनाला देशभरातून उत्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळालं.

दिवसभर घरात राहून नागरिकांनी देशावर आलेल्या संकटात सरकार आणि प्रशासनासोबत आहोत हे दाखवून दिले. सायंकाळी पाच वाजता देशातील कानाकोपऱ्यात पाच मिनटे टाळी-थाळी अन् घंटानाद करत अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे आभार मानले. 

आज सकाळपासून रात्री ९ वाजेपर्यंत मोदींनी ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींनीही कोरोनाशी लढा देण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. या कर्फ्यूच्या दरम्यान लोकांनी गॅलरीमध्ये येत एकीचे बळ दाखवून दिल्याचे पाहायला मिळाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button