breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

Scam २००३ टीझर प्रदर्शित आता अब्दुल करीम तेलगीचा घोटाळा येणार उघडकीस

Scam २००३ Teaser : Scam १९९२ नंतर आता लवकरच Scam २००३ हि सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिरीजच्या माध्यमातुन अब्दुल करीम तेलगीचा पेपर घोटाळा उघडकीस येणार आहे. आता ‘Scam २००३ द तेलगी स्टोरी’ या वेबसिरीजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

‘Scam २००३ द तेलगी स्टोरी’ ही सीरिज २ सप्टेंबरपासून सोनी लिव्हवर प्रसारित होणार आहे. या सीरिजची निर्मिती हंसल मेहता यांनी केली असून दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केले आहे. या सीरिजमघ्ये अब्दुल करीम तेलगीची भूमिका अभिनेते गगन देव रियार साकारणार आहेत.

हेही वाचा – ‘मणिपूर, हरियाणापाठोपाठ महाराष्ट्रातही दंगली घडवणयाचा प्रयत्न सुरू’; संजय राऊतांचा गंभीर आरोप 

‘Scam २००३ द तेलगी स्टोरी’ च्या टीझरमध्ये २००३ मधील मुंबईतील एक घटना दाखवली आहे. स्कॅम २००३ च्या टीझरमध्ये दिसतंय की, २००३ चा हा घोटाळा ३०,००० कोटींचा आहे. यामध्ये अब्दुल करीम तेलगीचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याचा चेहरा दिसतो. नेमका या वेबसीरिजमध्ये कोणता सेलिब्रिटी मुख्य भूमिकेत आहे, हे तरी गुलदस्त्यात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button