breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘ग’ प्रभागाध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन यांच्यावर भाजपात मोठी जबाबदारी

  • आमदार लक्ष्मण जगताप आणि शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी जाहीर

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या संघटन सरचिटणीस पदी ‘ग’ क्षेत्रीय प्रभाग अध्यक्ष व नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या वर्षी केलेल्या कामाची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी सलग दुसऱ्यांदा त्रिभुवन यांच्यावर विश्वास व्यक्त करत ही जबाबदारी सोपविली आहे. 

आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अनुसूचित जाती मोर्चाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी माजी खासदार अमर साबळे, प्रदेश सचिव अमित गोरखे, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा उज्वला गावडे, शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, सरचिटणीस राजू दुर्गे, अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष सुभाष सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘ग’ क्षेत्रीय प्रभागाचे अध्यक्ष व नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांचे कार्य, पक्षनिष्ठा, विविध पदांवर त्यांनी केलेली कामगिरी या सर्वांची दखल घेऊन व त्यांच्यावर विश्वास दाखवत पक्षश्रेष्ठींनी त्रिभुवन यांना सलग दुसऱ्यांदा अनुसूचित जाती मोर्चाच्या कार्यकारिणीत संधी दिली आहे. 

शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे व इतर मान्यवरांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button