breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

वंचितच्या २२ उमेदवारांची जातीनुसार पहिली यादी जाहीर

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी ।

वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या २२ उमेदवारांची घोषणा करताना जातीचा मुद्दा ठळकपणे मांडला आहे. लोकसभेवेळीही यादी जाहीर करताना त्यांनी उमेदवाराची जात प्रकर्षाने मांडली होती. आपल्या उमेदवारांचे नाव आणि मतदार संघ जाहीर करताना त्यांनी मुद्दाम त्या पुढे त्यांची जात प्रकर्षाने लिहिली आहे. 

महाराष्ट्रात ७० वर्षात प्रस्थापित पक्षांनी जातीचे आणि घराणेशाहीचे राजकारण केल्याचा आरोप आपल्या प्रसिद्धपत्रकात केला आहे. या प्रस्थापितांनी बहुजन, कारागीर, उद्योजक, अलुतेदार, बलुतेदार जातींना महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण व अर्थकारणापासून दूर ठेवल्याचे म्हटले आहे.  त्यामुळे महाराष्ट्राच्या विकास, धोरणात प्रचंड प्रादेशिक  सामाजिक असमतोल व शोषण निर्माण झाले. याचे दुष्परिणाम म्हणून आज बेकारी, शेतकरी आत्महत्या, गरीबी, ओला व सुका दुष्काळ अशा अनेक समस्यांनी महाराष्ट्रातील जनता बेजार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी पुन्हा या वंचित समूहातील दुर्बल अल्प लोकसंख्येच्या अलुतेदार, बलुतेदाराना रिंगणात उतरवणार आहे. या समाजातील उमेदवारांची पहिली यादी त्यांच्या समाजाची (जातींच्या ऐवजी समाज असा शब्द प्रयोग केला पाहिजे) नोंद करून आम्ही आज प्रसारित करत आहोत, असे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 

 उमेदवारांची यादी 

  1. सुरेश जाधव,   शिराळा –   रामोशी
  2. डॉ. आनंद गुरव, करवीर  –  गुरव  
  3. दिलीप पांडुरंग कावडे, दक्षिण कोल्हापूर  –    गोंधळी
  4. बाळकृष्ण शंकर देसाई, कराड-दक्षिण –  लोहार
  5. बाळासाहेब चव्हाण, कोरेगाव – नंदिवाले
  6. दीपक शामदिरे, कोथरुड  – कैकाडी
  7. अनिल कुऱ्हाडे, शिवाजीनगर – वडार
  8.  मिलिंद काची, कसबा पेठ   – काची-राजपूत
  9.  शहानवाला जब्बार शेख, भोसरी  – छप्परबंद, मुस्लीम
  10.   शाकीर इसालाल तांबोळी, इस्लामपूर – तांबोळी
  11.   किसन चव्हाण, पाथर्डी-शेवगाव – पारधी
  12.  अरुण जाधव, कर्जत-जामखेड , कोल्हाटी 
  13.   सुधीर शंकरराव पोतदार, औसा – सोनार
  14.   चंद्रलाल वकटुजी मेश्राम – ब्रह्मपुरी – ढीवर
  15.   अरविंद सांडेकर – चिमूर, माना आदिवासी
  16.    माधव कोहळे – राळेगाव, गोवारी
  17.   शेख शफी अब्दुल नबी शेख – जळगाव, – पटवे-मुस्लिम
  18.   लालसू नागोटी – अहेरी, माडीया आदिवासी
  19.   मणियार राजासाब – लातूर शहर, मणियार
  20.   नंदकिशोर कुयटे – मोर्शी, भोई
  21.   अड आमोद बावने – वरोरा, ढीवर
  22.  अशोक विजय गायकवाड – कोपरगाव, भिल्ल
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button