breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘कोविड-१९’ विरुध्दच्या लढाईत ‘बँकांनी जपली सामाजिक बांधिलकी

‘सीएसआर’ निधीतून विविध उपकरणांचा पुरवठा

पालकमंत्री अजित पवारांच्या आवाहनाला प्रतिसाद   

पिंपरी | प्रतिनिधी

 ‘कोविड-१९’ विरुध्दच्या लढाईत सामाजिक बांधिलकी राखत समाजातील सर्वस्तरातील व्यक्ती आणि संस्थांनी मदतीचा हात देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत एचडीएफसी, बंधन बॅंक, ॲक्सिस बॅंक या बँकांनी आपल्या  (सामाजिक उत्‍तरदायित्‍व निधी) ‘सीएसआर’ निधी मोठ्या प्रमाणात ‘कोविड-१९’विरुद्धच्‍या लढ्यासाठी उपलब्ध करुन दिला. या निधीच्या माध्यमातून ‘कोविड-१९’ लढ्यासाठी आवश्यक असणारी विविध उपकरणे आणि आवश्यक सामुग्री उपलब्ध करुन देण्यात आली.

‘कोविड आणि स्वच्छ भारत’ अभियानासाठी उभारण्यात आलेल्या टेक्नोपर्पल नियंत्रण प्रणालीचे ई-उद्घाटन, ‘बंधन बँके’च्या माध्यमातून दळवी रुग्णालयात लावण्यात आलेल्या ९८ पॉईन्ट असलेल्या जम्बो ऑक्सिजन यंत्रणा तसेच ससून रुग्णालयात लावण्यात आलेल्या ड्युरा सिलेंडरच्या वाफेच्या यंत्रणेचे ई-उद्घाटन, ‘एचडीएफसी’ बँकेच्या माध्यमातून कै. मुरलीधर पांडुरग लायगुडे रुग्णालयाला पुरविण्यात आलेल्या दोन ऑक्सिजन जनरेटरचेही ई-उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर ‘बंधन बँके’च्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सामुग्रीसह  ‘कोविड’  जनजागृतीची यंत्रणा असलेल्या दूरदर्शन संचाचेही लोकार्पण करण्यात आले. 

 ‘एचडीएफसी’ बँकेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या एचएएल मशीन, संगणक संच, पोर्टेबल एक्स-रे मशीन, इसिजी मशिन, पुणे शहरासाठीचे दोन मोबाईल क्लिनीक, कार्डीयाक रुग्णवाहिका, शववाहिका,  निगेटिव्ह आयन जनरेटरचेही लोकार्पण करण्यात आले. यावेळी ‘कोविड’च्या काळात करण्यात आलेल्या विविध कामांसंबंधीची लघुचित्रफित दाखविण्यात आली. यापूर्वीही एचडीएफसी, बंधन बँक, ॲक्सिस बँकांसह इतर संस्थांनी ‘कोविड-१९’च्या लढ्यासाठी मोठी मदत केली आहे.

कौन्सिल हॉलमध्‍ये झालेल्‍या या कार्यक्रमास आ. चेतन तुपे,  आ. अण्णासाहेब बनसोडे, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पिंपरी-चिंचवडचे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ससूनचे अधिष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे, बंधन बॅंकेचे प्रादेशिक प्रमुख सत्यजित मोहिते, एचडीएफसी बॅंकेच्या राज्य प्रमुख स्वाती शाळीग्राम, लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ बुटाला यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button