breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Pimpri Chinchwad | इलेक्ट्रिक साहित्य ठेवलेल्या गोडाऊनला भीषण आग

पिंपरी : सोमवारी (दि. ११) पहाटे साडेबारा वाजताच्या सुमारास इलेक्ट्रिक साहित्य ठेवलेल्या गोडाऊनला भीषण आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.नरसिंग निवृत्ती नरवटे यांचे नम्रता इलेक्ट्रिक्स अँड केबल हाऊस नावाचे इलेक्ट्रिक दुकान आहे. त्यांचे गोडाऊन टॉवर लाईन जवळ आहे.

सोमवारी पहाटे साडेबारा वाजताच्या सुमारास त्यांच्या गोडाऊन मध्ये आग लागली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाचे सर्व बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यासह टाटा कंपनी, बजाज कंपनी तसेच एमआयडीसीचे बंब देखील घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

हेही वाचा – ऑस्करमध्ये ‘ओपनहायमर’ची बाजी, ऑस्कर विजेत्यांची पूर्ण यादी वाचा

अजूनही गोडाऊन मधून धूर येत आहे. त्यामुळे जेसीबीच्या साह्याने सर्व साहित्य बाजूला करून ही आग पूर्णपणे विझवली जाणार आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र ही आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटने लागली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. रात्रीच्या वेळी गोडाऊनमध्ये कोणीही नसल्याने सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. गोडाऊनमध्ये इलेक्ट्रिक केबल, बोर्ड आणि इतर सामान ठेवलेले होते. हे सर्व साहित्य आगीत जळाले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button