breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

हैदराबाद बलात्कार प्रकरण: आरोपीची पत्नी म्हणाली, मलाही त्याच ठिकाणी नेऊन गोळी घाला

महाईन्यूज | हैद्राबाद

तेलंगणची राजधानी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार झाले होते. अधिक तपासासाठी त्यांना घटनास्थळी आणल्यानंतर त्यांनी पोलिसांवर हल्ला केला होता व तसंच त्यांनी पोलिसांच्या बंदुकाही हिसकावून घेतल्या होत्या. त्यानंतर बचावासाठी करण्यात आलेल्या गोळीबारात ते ठार झाले, अशी माहिती हैदराबाद पोलिसांकडून देण्यात आली होती. यानंतर त्यातील एका आरोपीच्या पत्नीनं प्रतिक्रिया दिली आहे. तर आता आपल्याकडे जगण्यासाठी काहीही उरलं नसून माझ्या पतीला ज्या ठिकाणी ठार केलं त्याच ठिकाणी मलाही नेऊन मारा अशी प्रतिक्रिया एका आरोपीच्या पत्नीनं दिली आहे. पतीला काहीही होणार नाही, तो लवकरच घरी परतेल, असं आपल्याला सांगितलं होतं असंही ती म्हणाली आहे.

तर आपला मुलगा ठार झाला हे ऐकून आपल्याला धक्का बसला, अशी प्रतिक्रिया अन्य एका आरोपीच्या आईनं दिली आहे. माझ्या मुलाने जर गुन्हा केला असेल तर त्याला कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी असं त्या आरोपीच्या वडिलांनी म्हटलं होते.आपल्या मुलानं कदाचित हा गुन्हा केलाही असेल परंतु त्याचा असा अंत व्हायला नको होता. अनेक लोक बलात्कार करतात, खून करतात पण त्यांची अशी हत्या केली जात नाही, त्यांना अशी वागणूक का दिली जात नाही, असा सवाल एका आरोपीच्या वडिलांनी उपस्थित केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button