breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

माजी रणजीपटू शेखर गवळी यांचा दरीत कोसळून मृत्यू

नाशिक – महाराष्ट्राचे माजी रणजीपटू शेखर गवळी हे कसारा घाटात पाय घसरून दरीत बेपत्ता झाले आहेत. नाशिक जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन तसंच अग्निशमन दल शोध मोहिम राबवत आहे. शेखर गवळी त्यांच्या मित्रांसह इगतपुरी येथील मानस हॉटेल परिसरात पर्यटनासाठी गेले होते. मंगळवारी सायंकाळी ५.३० ची घटना. अंधार झाल्यामुळे शोध मोहिम थांबवण्यात आली होती.

आज सकाळपासून पाणबुड्यांच्या मदतीने दोन डोहात शेखर यांचा शोध घेण्यास पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. शेखर गवळी नाशिक मध्ये खेळणाऱ्या क्रिकेट पटुची प्रशिक्षक होते. तसेच काही रणजी प्लेयर्स सुद्धा त्यांच्या हाताखाली तयार झाले होते. क्रिकेटमधील एक उत्तम प्रशिक्षक म्हणून त्यांचं नाव होत त्यांना सायकलिंग आणि ट्रेकिंगची आवड होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button