breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus |धारावीत आज ९४ रुग्ण वाढले, दोघांचा मृत्यू

मुंबई | लॉकडाऊनचा कालावधी १७ मेपर्यंत वाढवण्यात आला असतानाही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. धारावीत ९४ रूग्ण वाढले तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. धारावीत एकूण कोरोना रूग्णांची संख्या ५९० पोहोचली तर एकूण मृत्यू संख्या २० वर गेली आहे.

माहिममध्ये १६ रूग्ण वाढले तर एकाच मृत्यू झाला आहे. माहिममधील एकूण रूग्णसंख्या ६८ वर पोहोचली तर इथे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला. दादरमध्ये देखील ४ रूग्णांची वाढ झाल्याचे दिसून आले. दरम्यान एकाचा मृत्यू आहे. दादरमधील रूग्णसंख्या एकूण ५० वर पोहोचली आहे. तर मृत्यूसंख्या ४ वर पोहोचली आहे.मुंबई महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत ४४१ रूग्ण वाढले असून २१ जणांचा मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button