breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निगडीत सराईत गुन्हेगाराकडून गोळीबार; एक जण जखमी

पिंपरी  |महाईन्यूज| 

सराईत गुन्हेगाराने केलेल्या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी(ता.26) रात्री साडेअकराच्या सुमारास निगडीतील ओटास्कीम येथे घडली. आकाश दोडमने (रा. श्रीराम हौसिंग सोसायटी, अंकुश चौक, ओटास्कीम, निगडी) असे गोळीबारात जखमी झालेल्याचे नाव आहे. तर किरण खवले असे  गोळीबार केलेल्याचे नाव आहे.

दोडमने व खवले यांच्यात अनेक दिवसांपासून वाद आहे. दरम्यान, बुधवारी रात्री त्यांच्यात भांडण झाले. यामध्ये खवले याने आपल्याजवळील पिस्तुलातून दोडमने याच्यावर गोळीबार केला. त्यापैकी एक गोळी दोडमाने याच्या पायाला लागल्याने तो जखमी झाला. त्यानंतर खवले घटनास्थळावरून पसार झाला.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना झाली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button