breaking-newsपिंपरी / चिंचवड

नागरिकांनो स्वच्छ सर्व्हेक्षणासाठी सकारात्मक उत्तरे द्या

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

स्वच्छ सर्वेक्षण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी महाराष्ट्रात सुरु आहे. सर्वेक्षण सुरु झाल्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रिया घेताना सात प्रश्न विचारण्यात येणार आहेत. याचे योग्य व अपेक्षित उत्तरे  नागरिकांकडुन मिळाल्यास स्वच्छ  सर्वेक्षणातील चौथ्या भागातील नागरिकांचा प्रतिसाद पाहून माहिती शिक्षण व संवाद (IEC)करीता ११०० गुण मिळणार आहेत.

स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये शहरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्यात येणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये सहभागी झाले आहे. शहरातील परिसर स्वच्छ, सुंदर, हरित असून शहरातील स्वच्छतागृह स्वच्छ आहेत. पालिकेचे कर्मचारी ओला व सुका कचरा वेगळा देण्यास सांगतात. शहरास हागणदारीमुक्त (ओडीएफ++)दर्जा व स्टार मानांकन मिळाले आहे.

माहिती शिक्षण व संवाद (IEC) अंतर्गत नागरिकांना सर्वेक्षणाची माहिती पोहचावी म्हणुन स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत याबाबत आर्ट वर्क (‍डिजाईन) तयार करण्यात आले आहे. पालिकेमार्फत वेबसाईट, व्हाटसऍप ग्रुप, फेसबुक, ई-मेल, बल्क एसएमएस याद्वारे ही माहिती प्रसिध्द करण्यात आलेली आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button