breaking-newsताज्या घडामोडीपुणे

ऊसतोड करताना शेतात आढळली तीन बिबट्यांची पिल्ले

पुणे |महाईन्यूज।

शिरुर तालुक्यातील नागरगाव येथील शेतकऱ्यांच्या ऊसाच्या शेतात उसतोड सुरू असताना बिबट्याची तीन पिल्ले आढळ्याने एकच खळबळ उडाली आहे. शेतकऱ्याने या बाबतीत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यावर वनअधिकाऱ्यांना घटना स्थळीधाव घेत पिल्यांना ताब्यात घेतले. यावेळी जुन्नर वनविभागाचे अधिकारी डॉ. अतुल देशमुख यांनी सापडलेल्या बिबट्याच्या पिल्लांची तपासणी करून पुन्हा त्यांना सोडून दिले.

दोन दिवसांपुर्वीच येथे नागरिकांना बिबट्या वावर करतांना आढळला होता. आता बिबट्याची पिल्ले आढळून आल्याने या ठिकाणी त्वरित पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत. दोन दिवसापुर्वी शेजारील इनामगाव येथे एका जेष्ठ महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता. त्याच धर्तीवर नागरगाव येथे बिबट्याचे आढळ्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button