breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus| उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे दोन रुग्ण

उस्मानाबाद | जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित एकूण दोन रुग्ण आढळून आलेत. यातील एक रुग्ण उमरगा तालुक्यातील असून दुसरा रुग्ण लोहारा तालुक्यातील धानुरी इथला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिली. लोहाऱ्यातला तरुण काही दिवसांपूर्वी मुंबई इथून आला होता. तो मुंबईतील हॉटेल ताजमध्ये काम करत होता, अशी माहिती समोर आली.

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ताज हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचे स्वॅब नमुने घेऊन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच या तरुणाच्या संपर्कात आलेल्या २५ जणांना आयसोलेट करण्यात आले आहे. तर उमरगा तालुक्यातील बलसुर इथे सापडलेला कोरोनाबाधीत रुग्ण हा दिल्ली आणि पानिपत इथे कार्यक्रमानिमित्त गेला होता. तो काही दिवसांपूर्वी उमरगा येथे आला होता, त्यांनतर त्याचे स्वॅब नमुने घेतले होते त्यातील त्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यावर उमरगा उपजिल्हा रुग्णालयाच्या कक्षात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक राजाभाऊ गलांडे यांनी दिली. बलसुर येथील हा रुग्ण पॉझिटिव्ह आहे मात्र त्याची पत्नीचा अहवाल निगेटीव्ह आहे. पानिपत आणि हॉटेल ताजमार्गे कोरोनाने उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश केल्याची बाब उघड झाली आहे. एकाच दिवसात दोन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून, नागरिक धास्तावले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button