breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागरिकांच्या पैशावर नगरसेवकांसह कुटूंबियाचा उतरविला आरोग्य विमा

एका वर्षासाठी प्रत्येक पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा, तब्बल 29 लाखाची उधळपट्टी

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 126 नगरसेवकांसाठी वार्षिक पाच लाख रूपयांची आरोग्य विमा योजना राबविण्यात आली आहे. ही योजना नगरसेवकासह त्यांची पत्नी अथवा पती आणि 21 वर्षापर्यंतच्या दोन अपत्यांसाठी लागू आहे. या योजनेसाठी 28 लाख 64 हजार 865 रुपये खर्च होणार आहे. या योजनेस स्थायी समितीने आज ( मंगळवारी) झालेल्या सभेत मान्यता दिली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती ममता गायकवाड होत्या.  

पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेवकांचे संख्याबळ 128 आहे. तर पाच स्वीकृत सदस्य असे एकूण 133 नगरसेवक आहेत. या 133 नगरसेवक आणि त्यांच्या कुटूंबीयांसाठी महापालिकेतर्फे आरोग्य विमा योजना लागू करण्यात आला. मात्र, 128 नगरसेवकांपैकी सात नगरसेवकांनी आरोग्य विमा योजनेची सवलत स्वीकारण्यास यापुर्वीच नकार दर्शविला आहे. त्यामुळे 121 अधिक पाच स्वीकृत अशा 126 नगरसेवक आणि त्यांच्या कुटूंबीयांसाठी पाच लाखांपर्यंत आरोग्य विमा योजना लागू करण्यात येणार आहे. हा विमा नगरसेवक दाम्पत्य आणि त्यांच्या 21 वर्षापर्यंतच्या दोन अपत्यांसाठी लागू राहणार आहे.

महापालिकेतर्फे मार्श इंडिया इन्शुरन्स ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड या विमा कंपन्यांकडून 126 नगरसदस्य व त्यांचे कुटूंबियांचा एक वर्षांचा विमा काढण्यात आलेला आहे. एक वर्ष कालावधीकरिता 5 लाख रुपये इतक्या रक्मेचा आरोग्य विमा योजनेस मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढील वर्षांच्या आरोग्य विमा योजनेसाठी मार्श इंडिया इन्शुरन्स ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला 28 लाख 64 हजार 865 रुपये विमा कंपनीस अदा करण्यात येणार आहेत. तसेच माहे 2022 अखेर असणा-या माजी नगरसदस्य याचे आरोगय् विम्याचे दरवर्षी नुतनीकरण करणेस मान्यता देण्यात आली. त्यामुळे मार्श इंडिया इन्शूरन्स ब्रोकर्स या कंपनीबरोबर करारनामा करून 126  नगरेसवकांसह त्यांच्या कुटूंबीयांचा आरोग्य विमा काढण्यात आला आहे.

दरम्यान, महापालिकेच्या करदात्यांच्या कररुपी आलेल्या पैशातून महापालिेकेच्या आजी व माजी नगरसदस्यांचा आरोग्य विमा योजना लागू करण्यात आल्याने दरवर्षी लाखो रुपयाची उधळपट्टी होवू लागली आहे. नगरसेवकांनी नागरिकांच्या पैशातून स्वताः आणि कुटूंबियाचा आरोग्य विमा उतरविल्यामुळे अनेक सुज्ञ नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button