breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट, पाच मुलींची सुटका

पुणे |महाईन्यूज|प्रतिनिधी|

पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. हे सेक्स रॅकेट एका स्पा सेंटरमध्ये सुरु होतं. पोलिसांच्या टीमने बुधवारी संध्याकाळी स्पा सेंटरवर छापा टाकत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरुन पाच परदेशी मुलींची सुटका केली आहे.

पुणे पोलिसांच्या क्राइम ब्राँच युनिटमधील सामाजिक सुरक्षा विभागाला एक गुप्त माहिती मिळाली होती की, कोरेगाव पार्कमधील स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरु आहे. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या टीमने त्याची खातरजमा केली. स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची पोलिसांना खात्री पटली आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

पुणे पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी ५.१० मिनिटांनी कोरेगाव पार्कमधील झिवांका स्पा अॅन्ड वेलनेस सेंटरवर अचानक छापा टाकला. पोलिसांनी छापा टाकून आरोपी गोपाळ रमेश मिश्रा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. आरोपी गोपाळ रमेश मिश्रा हा या परदेशी मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होता.

आरोपी ३२ वर्षीय गोपाळ मिश्रा हा पुण्यातील गंगानिवास रामनगर येथे राहतो. पोलिसांनी आरोपी गोपाळ मिश्राच्या विरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अनधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

तर घटनास्थळावरुन सुटका करण्यात आलेल्या पाचही परदेशी मुलींना संरक्षण आणि पुनर्वसनकामी रेस्क्यु फाऊंडेशन मुंढवा, पुणे येथे पाठवण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button