breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भारतात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची एन्ट्री, 6 जण नव्या विषाणूमुळे बाधित

मुंबई – कोरोनाच्या संसर्गाचा वेग कमी होत असतानाच ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या करोनानं डोकेदुखी वाढवली आहे. वेगानं पसरणाऱ्या कोरोनाच्या या नवीन प्रकारानेही जगभरात हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत १६ देशात पोहोचलेल्या करोनाच्या नव्या प्रकाराने आता भारतातही शिरकाव केला आहे.

वाचा :-देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,02,24,303 वर

देशातील 6 व्यक्तींच्या नमुन्यांमध्ये नव्या विषाणू आढळून आले आहेत. या सहा व्यक्ती ब्रिटनमधून भारतात परतले होते. देशातील वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रित केलेल्या नमुन्यांमधून ही बाब स्पष्ट झाली आहे. बंगळुरुच्या NIMHANS मध्ये 3, हैदराबाद येथील CCMB प्रयोगशाळेत 2 आणि पुण्यातील राष्ट्रीय विषाणून संशोधन संस्थेकडे आलेल्या एका नमुन्यांमध्ये कोरोनाचा नवा अवतार आढळला आहे. कोरोना विषाणूचा नवा अवतार पहिल्या विषाणूपेक्षा 70 टक्के जादा घातक आहे.

या नव्या प्रकारच्या विषाणूला रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी ब्रिटनमधून येणारी विमान थांबवली आहे. मात्र, तरीही नव्या करोनानं भारतात पाऊल ठेवलं आहे. २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान ब्रिटनमधून ३३ हजार नागरिक भारतात परतले. या सर्व प्रवाशांचा शोध घेण्यात आला आणि चाचण्या करण्यात आल्या.

कोरोना विषाणूचा नवा घातक अवतार ब्रिटनमध्ये समोर आला होता. तेव्हापासून कोरोनाचा नवा अवतार 19 देशांमध्ये पसरला आहे. या विषाणूचा संक्रमणाचा वेग जास्त असल्यामुळे जगामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. लंडन आणि साऊथ इंग्लंडमध्ये लॉकडाऊन लावत, ख्रिसमसच्या उत्साहावर देखील निर्बंध घालण्यात आले आहेत. तर, भारतानं यूके आणि मध्य-पूर्वेतून येणाऱ्या विमान वाहतूकीवर 31 डिसेंबरपर्यंत बंदी घातली आहे.

कोरोनाच्या SARS-COV-2 नव्या अवताराला “VUI-202012/01” किंवा B.1.1.7, असं म्हटलं गेलं आहे. हा विषाणू पूर्वीच्या विषाणूच्या तुलनेत वेगानं संक्रमित होतो. यामुळे ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण वाढले आहेत. कोरोनाच्या नव्या विषाणूच्या संसर्गाची तीन प्रमुख लक्षण आढळून आली आहेत. यामध्ये ताप, सर्दी, खोकला, वास न येणे याचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button