breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

शरद पवार यांचा आज अन्नत्याग; राज्यसभेतील निलंबित 8 खासदारांना पाठिंबा

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे खासदार शरद पवार यांनी आज अन्न त्याग करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान रविवार म्हणजे 20 सप्टेंबर दिवशी संसदेमध्ये उपसभापती यांच्यासमोर काही खासदारांनी गोंधळ घातल्यानंतर 8 जणांचे निलंबन करण्यात आले होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज शरद पवारांनी अन्नत्याग करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

मुंबई मध्ये पत्रकार परिषदेमध्ये संसदेच्या राज्यसभेत घडलेल्या प्रकाराची शरद पवारांनी माहिती दिली आहे. त्यावेळेस त्यांनी उपसभापती हरिवंश यांचं कामकाज धक्कादायक असल्याचं म्हणताना कृषीविधेयकावर चर्चा होणं गरजेचे असल्याचं सांगितलं आहे. मात्र चर्चा झालीच नाही. हे चूकीच आहे.

दरम्यान आज सकाळी हरिवंश यांनी निलंबित खासदारांच्या आंदोलनाची दखल घेत त्यांना चहा, नाश्ता देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या खासदारांनी चहा नाकराला. यावरही शरद पवारांनी प्रतिक्रिया देत म्टटलं की , ‘मला आनंद झाला त्यांनी चहाला हात लावला नाही.’

https://www.facebook.com/mahaenews.in/videos/676983452929144/

कृषी विधेयकावरून जो गदारोळ झाला आणि नंतर निलंबन करण्यात आले त्यावरून 8 खासदारांनी काल पासून संसदेत महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ बसून आंदोलन केले आहे. त्यांच्या अभियानामध्ये सहभागी होत शरद पवारांनी आता अन्नत्याग करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आजचा दिवसभर माझा अन्न त्याग हा त्यांना पाठिंबा असेल असेदेखील त्यांनी म्हटले आहे. दरम्यान बाजार खुला केला मग कांद्यावर निर्यात बंदी का? असा सवाल शरद पवार यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. त्यांच्या कृषी धोरणामध्ये विरोधाभास असल्याचं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान कालपासून दिल्लीमध्ये आंदोलन करणार्‍या 8 निलंबित खासदारांनी त्यांचं आंदोलन आता मागे घेतलं आहे. राज्यसभेत विरोधकांनी उर्वरित अधिवेशनावर बहिष्कार टाकल्याने आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button