breaking-newsताज्या घडामोडी

नागपूरवर क्राइम कॅपिटलचं लेबल कायम, सहा दिवसात सहा मर्डर

नागपूर | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचं होमटाऊन असलेल्या नागपूरवर क्राइम कॅपिटलचं लेबल कायम असल्याचं दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यात हत्यांचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. नवीन वर्षात अवघ्या सहा दिवसात नागपूर जिल्ह्यात हत्येच्या सहा घटना घडल्या आहेत. त्यामुळे नवे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या होमटाऊन मध्येच गुन्हेगारांनी अक्षरश हैदोस मांडल्याचे चित्र आहे.

आज सकाळी नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत काचूरवाही या ठिकाणी 54 वर्षीय अशोक वाडीभस्मे यांची हत्या करून त्यांचे मृतदेह शेतात पुरून ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. अशोक वाडिभस्मे हे नागपूर जिल्ह्यातील काचूरवाही येथे पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट मास्तर म्हणून कार्यरत होते. पाच जानेवारीपासून ते बेपत्ता होते. सोमवारी त्यांच्या कुटुंबीयांनी रामटेक पोलीस स्टेशनमध्ये ते बेपत्ता असल्याची तक्रारही दिली होती.

आज सकाळी काचूरवाही येथील त्यांच्याच मालकीच्या शेतात अशोक वाडीभस्मे यांचे मृतदेह खड्ड्यात पुरलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी अशोक वाडीभस्मे यांच्या हत्येचा गुन्हा नोंदवत आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेतले असून तपास केला जात आहे. दरम्यान नागपूर जिल्ह्यात गेल्या सहा दिवसात एकानंतर एक हत्येच्या सहा घटना घडल्या आहेत. यातील काही घटना तर गुन्हेगारांमधील संघर्षातून घडल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button