breaking-newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमराठवाडामहाराष्ट्र

राहुल गांधींनी मुलाला दिला मदतीचा हात, कॉम्प्युटर पाहिला नाही, पण सॉफ्टवेअर इंजिनिअर बनण्याचं स्वप्न

नांदेड । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या नांदेडमध्ये आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी समाजातील प्रत्येक जाती धर्माच्या लोकांची गाठीभेटी आनंदाने स्वीकारताना दिसतायतं. अशात राहुल गांधी यांनी एका तरुणाप्रती दाखवलेल्या संवेदनशीलतेचे आज सर्वत्र कौतुक होत आहे. राहुल गांधींनी नांदेडमधील सर्वेश हाटणे या मुलास लॅपटॉप भेट दिला आहे.

दिल्लीतील अनेक काँग्रेस नेते आज भारत जोडो यात्रेनिमित्त नांदेडमध्ये आलेत हे पाहून सर्वेश देखील यात्रेत राहुल गांधी यांना भेटण्यासाठी आला. राहुल गांधींनी त्याची भेट घेतली. यावेळी राहुल गांधींनी सर्वेशला विचारलं तुला मोठं होऊन काय बनायचंय. ज्यावर सर्वेशने मला सॉफ्टवेअर इंजिनीअर बनायचंय असं सांगितलं. यानंतर आजवर तु कॉम्प्युटर पाहिला का? असा प्रश्नही राहुल गांधींनी यावेळी विचारला. ज्यावर सर्वेशने नाही असं उत्तर दिलं.

यावेळी राहुल गांधी यांनी संवदेनशीलता दाखवत आज मुलाला लॅपटॉप भेट दिला. काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांच्यासह काही काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत त्या लहानग्या सर्वेशनला लॅपटॉप भेट देण्यात आला. दरम्यान राहुल गांधी यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेचं आता सर्वत्र कौतुक होत आहे. राहुल गांधी यांच्या या संवेदनशीलतेचे मनसेही कौतुक केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गजानन काळे यांनी राहुल गांधींच्या संवेदनशीलतेवर एक ट्विट करत, संवेदनशीलता जिवंत राहो, अशी भावना व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button