breaking-newsराष्ट्रिय

बापरे! जप्त केलेली कार परत मिळविण्यासाठी भरला लाखोंचा दंड

गुजरात | महाईन्यूज

गुजरातमध्ये एका व्यक्तीने पोलिसांनी जप्त केलेली आपली कार मिळवण्यासाठी तब्बल २७.६८ लाखांचा दंड भरला आहे. यामध्ये थकीत कर आणि त्यावरील व्याजाचाही समावेश आहे. योग्य कागदपत्रं नसल्याने पोलिसांनी पोर्शे ९११ कार जप्त केली होती. कारचे मालक रणजीत देसाई यांनी अहमदाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालयात दंडाची रक्कम भरल्यानंतर कार त्यांच्या हवाली करण्यात आली होती. नोव्हेंबर महिन्यात पोलिसांनी कार जप्त केलेली होती.अहमदाबाद वाहतूक पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर आरटीओच्या पावतीचा फोटो शेअर करत, यामध्ये त्यांनी कारमालकाला २७.६८ लाखांचा दंड ठोठावल्याची माहिती दिलेली आहे. देशात पहिल्यांदाच इतका मोठा दंड वसूल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

“योग्य कागदपत्रं नसल्याने वाहतूक पोलिसांनी कार जप्त केली होती. यासाठी आरटीओने २७.६८ लाखांचा दंड ठोठावला. देशात आतापर्यंत ठोठावण्यात आलेली दंडाची ही सर्वात मोठी रक्कम आहे,” असं पोलिसांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे. हेलमेट क्रॉसरोड येथे २८ नोव्हेंबर रोजी नंबर प्लेट नसल्याने पोलिसांनी कार जप्त केली होती.  “यामुळे आम्ही कार जप्त करत मोटार वाहन कायद्यांतर्गत आरटीओ मेमो जारी केला होता. याचा अर्थ चालकाने आरटीओकडे दंडाची रक्कम जमा करावी आणि कार परत मिळवण्यासाठी पावती घेऊन हजर राहावं,” असं पोलिसांनी सांगितलं आहे. सुरुवातीला चालकाला ९.८ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. पण जेव्हा कारमालक दंडाची रक्कम भरण्यासाठी पोहोचले तेव्हा आरटीओने जुना रेकॉर्ड पाहिला आणि दंडाची रक्कम २७.६८ लाखांपर्यंत पोहोचली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button