breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय

‘नववर्षाच्या’ स्वागतासोबत अमली पदार्थविरोधी पथक सज्ज

मुंबई | महाईन्यूज |

नव्या वर्षांच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या तरुणांच्या हाती अमली पदार्थ लागू नयेत यासाठी अमली पदार्थविरोधी पथकाने विशेष योजना आखली आहे. पथकाने अमली पदार्थाची तस्करी, विक्री करणाऱ्या ८०० हून अधिक आरोपींच्या हालचाली टिपण्यास सुरुवात केली आहे. त्यासोबत पुनर्वसन केंद्रातून अमली पदार्थ मागे सोडून आलेल्या ४०० तरुणांवरही नजर ठेवण्यात येणार आहे.

मुंबईच्या विविध उपनगरांची रचना, तेथील जीवनशैली, लोकवस्ती आणि तेथे सर्वाधिक विक्री होणारे अमली पदार्थ याचा विचार करून पथकाने शहरातील पाच कक्षांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. पश्चिम उपनगरातील कांदिवली आणि वांद्रे कक्षावर पब, नाइट क्लब, लाऊंज, हॉटेल येथे आयोजित सार्वजनिक तर मढ, आक्सा, गोराई येथील खासगी बंगल्यांमध्ये चार भिंतींआड ठरावीक व्यक्तींसाठी होऊ घातलेल्या पाटर्य़ावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या कक्षांवर असेल. शहर, मध्य मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर नववर्ष स्वागतासाठी गोळा होणारी गर्दी, परदेशी पर्यटक वास्तव्यास असलेली हॉटेल आदींवर अमली पदार्थविरोधी पथकाच्या आझाद मैदान आणि वरळी कक्षाची नजर असेल.

या भागात एलएसडी, आईस अशा पार्टी ड्रग्जसह कोकेन, एमडीसारखे रासायनिक अमली पदार्थ मोठय़ा प्रमाणात विकले जातात. त्यामुळे अशा अमली पदार्थाची वाहतूक, साठा, विक्री करणाऱ्या साखळीतील व्यक्तींच्या हालचालींवर पथक लक्ष ठेवण्यासाठी सज्ज झाले आहे. त्याचप्रमाणे चरस, गांजासह कफ सिरप आणि औषधी गोळ्यांची नशा करणारा वर्ग मोठय़ा प्रमाणात आहेत. ते लक्षात घेता औषध वितरक, विक्रेत्यांना विश्वासात घेत अवैधरीत्या विक्री करणाऱ्या व्यक्ती, टोळ्यांवर पथकाच्या घाटकोपर कक्षाकडून नजर ठेवली जाणार आहे.

आठशेहून अधिक सराईत विक्रेत्यांचे सर्व तपशील पथकाकडे आहेत. त्यावरून यातील प्रत्येक व्यक्तीचा सध्याचा ठावठिकाणा, त्याचा व्यवसाय पोलिसांकडून तपासले जात आहेत. अमली पदार्थ विकणाऱ्यांव्यतिरिक्त नशा करून गर्दीत चोरी, लूटमार किंवा छेडछाड, विनयभंग आदी गुन्हे घडू नयेत यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आली आहे. सार्वजनिक पार्ट्यांमध्ये पथकाचे अधिकारी साध्या वेशात मिसळून तेथील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणार आहेत असही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. नविन वर्षाचं स्वागत करत असताना लोकांना सामाजिक भान असणंही तितकचं महत्त्वाचं आहे …

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button