breaking-newsआंतरराष्टीय

अफगाणिस्तानात दोघांचा राष्ट्राध्यक्षपदाचा शपथविधी; तालिबानसोबतच्या शांतता वाटाघाटी संकटात

काबूल | महाईन्यूज

अफगाणिस्तानमधील प्रतिस्पर्धी नेते अशरफ गनी आणि अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी वेगवेगळ्या समारंभात राष्ट्राक्षपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राजकीय पेच निर्माण झाला असून, तालिबानसोबतची अमेरिकेची शांतता वाटाघाटी करण्याची योजनाही संकटात आलेली आहे.

अशरफ गनी आणि अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी आपापसांतील मतभेद मिटविले नाहीत. गनी यांना मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत विजयी घोषित करण्यात आले होते. मतदानात गैरप्रकार केल्याचा आरोप अब्दुल्ला यांनी केला होता. निवडणूक आयोगाने याला दुजोरा दिल्याने दोघांनी स्वत:ला विजयी घोषित केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button