breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नवनगर विकास प्राधिकरणाच्या 679.89 कोटींच्या अर्थसंकल्पाला मान्यता

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – नागरिकांच्या निवा-यासाठी विविध ठिकाणच्या गृहप्रकल्पांसह संविधान भवन, औद्योगिक संग्रहालय, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रातील हेलीपॅड उभारणे आशा महत्वाच्या कामाचा समावेश असलेला आणि महसुली व भांडवली जमेचा अंतर्भाव असलेला 2019-20 या आर्थिक वर्षाचा 679 कोटी 89 लाख रुपयांचा अर्थसंकल्प पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण सभेला आज सादर केला. प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची सभा आज सदाशिव खाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्राधिकरणाचे कार्यकारी अधिकारी तथा सदस्य सचिव सतिशकुमार खडके यांनी हा अर्थसंकल्प प्राधिकरण सभेला सादर केला. खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत या अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आली. आरंभीची शिल्लक ठेवींवरील व्याज आणि दंडाची एकूण रक्कमेचा समावेश असलेला आणि भांडवली व महसूल खर्चाचा अंतर्भाव असलेला 679.89 कोटींचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला.

अर्थसंकल्पात महसुली खर्च 82.13 कोटी दाखविण्यात आला आहे. तर, भांडवली खर्च 592 एवढा दाखविण्यात आला आहे. 2019-20 च्या अर्थसंकल्पात ग्रहयोजना प्रकल्पासाठी 325 कोटींची तरतूद आहे. संविधान भवन व विपश्यना केंद्रसाठी 5 कोटी, औद्योगिक संग्रहालय, विरंगुळा केंद्र व ओपन जीमसाठी 8 कोटी, सोलार पार्कसाठी 1 कोटी हेलीपॅडसाठी 1 कोटी चिंतामणी चौक ते पॉवर हाऊस 24 मीटर रस्त्यासाठी 5 कोटी आणि सांस्कृतिक भवनसाठी 5 कोटींची तरतूद आहे. याशिवाय, रस्त्यांची कामे, पाणी पुरवठा व मलनिःसारण, उद्यान, पर्यावरण सुधारण व शहरी वनीकरणासाठी विशेष तरतूद केली आहे. गृहयोजना प्रकल्प, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र विकसित करणे तसेच इतर अभियांत्रिकी कामे, विद्युत आदी कामांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत.

अर्थसंकल्पातील प्रमुख वैशिष्ट्ये

  • पेठ क्रमांक 6, 12, 30 आणि 32 येथे गृहयोजना राबविणे – 325 कोटी
  • पेठ क्रमांक 11 येथे संविधान भवन आणि विपश्यना केंद्र बांधणे – 5 कोटी
  • औद्योगिक संग्रहालय, विरंगुळा केंद्रद्र आणि ओपन जिम बांधणे – 8 कोटी
  • पेठ क्रमांक 5 आणि 8 येथे सोलार पार्क उभारणे – 1 कोटी
  • आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रामध्ये हेलीपॅड उभारणे – 1 कोटी
  • चिंतामणी चौक ते पॉवर हाऊस 24 मीटर रूंद रस्ता करणे – 5 कोटी
  • पेठ क्रमांक 25 मध्ये सांस्कृतिक भवन बांधणे व दुरूस्त करणे – 5 कोटी
  • औंध – रावेत रस्त्यावर साई चौकात दोन समांतर उड्डाणपुल बांधणे – 5 कोटी
  • खुले प्रदर्शन केंद्र बांधणे – 44.81 कोटी
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button