breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

तरुणांनो आता लागा तयारीला! राज्यात लवकरच ७ हजार पोलिसांची मेगा भरती

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा 

मुंबई : राज्यात लवकरच ७ हजार पोलिसांची मेगा भरती होणार आहे. अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हि माहिती आज विधानसभेत दिली आहे. तसेच राज्यातील गृह विभागाला भरती करण्याचे आदेशही दिले आहेत. असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस विभागात मनुष्य बळ कमी पडत आहे. मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन लवकरच ७ हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, मुंबई परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत सदस्या मंदा म्हात्रे यांनी चर्चा उपस्थित केली होती. तेव्हा फडणवीस म्हणाले कि,नवी मुंबई परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. तसेच एका अधिकाऱ्यांस एकाच पदावर अथवा शहरात जास्त काळ नियुक्ती दिली जाऊ नये, याची  दक्षता घेतली जाईल, असे सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button