breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ मोठ्या उत्साहाने साजरा

पिंपरी : ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या उपाध्यक्ष अनिता संदीप काटे यांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास सर्व महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

शाळेच्या संचालिका निहारा काटे आणि लीना काटे या प्रसंगी उपस्थित होत्या. सर्व प्रथम शाळेच्या उपाध्यक्ष अनिता संदीप काटे आणि उपस्थित भगिनी वर्गाने केक कापून कार्यक्रमाची गोड सुरवात केली. लीना काटे यांनी आपल्या भाषणात महिलांच्या दैदिप्यमान कामगिरीबद्दल प्रशंसोद्दगार काढले.

शाळेच्या उपाध्यक्षा अनिता संदीप काटे यांनी आपले मनोगत मांडले. त्यांनी आपल्या भाषणात सावित्रीबाई फुले, डॉ आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे यांच्या कर्तृत्वाचा आदराने उल्लेख केला. एक स्री शिक्षित झाली कि एक कुटूंब शिक्षित होते आणि समाजात परिवर्तन घडवून आणते यासाठी शिक्षण घेणे, वाचन करणे आवश्यक आहे, असं त्या म्हणाल्या.

सर्व महिलांमधे वाचन संस्कृती व मूल्ये वाढीस लागावीत म्हणून त्यांनी उपस्थित महिलांना पुस्तकांचे वाटप केले. प्रीती तळेकर, दिप्ती बक्षी, सीमा सरदेसाई आणि आदिती चितळे यांनी आपले विचार व्यक्त केले. सर्व उपस्थितांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button