breaking-newsराष्ट्रिय

नवजोत सिद्धुचा तुरूंगवास टळला

  • एक हजार रूपये दंडावर केली सुप्रिम कोर्टाने सुटका 

नवी दिल्ली – माजी क्रिकेटपटू व पंजाबचे पर्यटन मंत्री नवज्योत सिद्धु यांना 1988 च्या रस्त्यावरील भांडणातून एका वयोवृद्ध व्यक्तीला जबरी मारहाण करून त्याच्या मृत्युला कारणीभूत ठरल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवले आहे. पण आज त्यांना या प्रकरणात कारावासाची शिक्षा देण्याचे मात्र न्यायालयाने टाळले आणि त्यांची एक हजार रूपये दंडाच्या अटींवर सुटका केली.

पंजाब आणि हरियाना उच्च न्यायालयाने या प्रकरणात सिद्धु यांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. ती शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली. सदोष मनुष्यवधाबद्दल त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली होती. याच प्रकरणात त्यांचा एक सहकारी रूपिंदरसिंग संधु यांनाही दोषी ठरवून तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती ती शिक्षाही सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली आहे. पंजाब आणि हरियाना उच्च न्यायालयाने ठोठावलेल्या कारावासाच्या शिक्षेच्या विरोधात सिद्धु याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

27 डिसेंबर 1988 रोजी सिद्धु व संधु यांनी पतियाळात शेरानवाला गेट चौकंत रस्त्यावरच आपली जिप्सी गाडी पार्क केली होती. त्यावेळी तेथे मारूतीकार घेऊन चाललेले गुरनामसिंग यांनी रस्त्यावर जिप्सी पार्क करण्यास आक्षेप घेतला. त्यातून त्यांच्यात बाचाबाची झाल्यानंतर सिद्धु आणि संधु यांनी त्यांना जबर मारहाण केली. त्यातच गुरूनामसिंग रूग्णालयात उपचार सुरू असताना मरण पावले.

या प्रकरणात पोलिसांनी सिद्धु यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पण 1999 साली ट्रायल कोर्टाने त्यांच्यावरील खुनाच्या आरोपातून त्यांची निर्दोष सुटका केली होती. पण उच्च न्यायालयाने सिद्धु आणि संधु या दोघांनाही या प्रकरणात दोषी ठरवून तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button