breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

हिमाचल प्रदेशमध्ये इमारत कोसळून सहा जवानांसह सातजण ठार

मुंबई – हिमाचल प्रदेशातील सोलनमधील कुमारहट्टी या ठिकाणी रविवारी इमारत कोसळून ७ जण ठार झाले आहेत. तर, ७ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ६ लष्करी जवानांचा आणि एका नागरिकाचा समावेश आहे. या ठिकाणी एनडीआरएफच्या टीमने मदत आणि बचाव कार्य सुरु केले आहे. लष्कराचीही मदत घेण्यात येते आहे.

सोलनचे उपायुक्त के. सी चमन यांनीही काही वेळापूर्वीच घटनास्थळी भेट दिली. आत्तापर्यंत १७ जवानांची सुटका करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच या दुर्घटनेत ६ जवान आणि १ नागरिकाचा मृत्यू झाला आहे असंही त्यांनी सांगितलं. ७ जवान अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button