breaking-newsक्रिडा

धावपटू हिमा दासने आशियाई क्रिडा स्पर्धेत कमवलेले सुवर्णपदक कोरोना वॉरियर्सला केले समर्पित

भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या धावपटू हिमा दास हिने तिचा सुवर्णपदक कोरोना वॉरियर्सना समर्पिमत केला आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ मध्ये हिमा दासला रौप्यपदक मिळालं होतं. तर, बेहरिनने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. मात्र बेहरिनच्या संघातील केमी अँडिकोया हिने उत्तेजन सेवन केल्याचं समोर आल्यानंतर त्यांचं सुवर्णपदक काढून घेण्यात आलं होतं. त्यामुळे रौप्यपदक मिळालेल्या हिमा दासला आता सुवर्णपदक मिळालं आहे. कोरोनाच्या काळात भारताला सुवर्णपदक मिळाल्याने हिमा दासने हे पदक कोरोना वॉरियर्सला समर्पित केलं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ मध्ये भारताने १६ सुवर्ण, २३ रौप्य आणि ३१ कांस्यपदकांची कमाई केली होती.

भारताच्या या संघात जगप्रसिद्ध धावपटू हिमा दासचाही सहभाग होता. हिमाबरोबर भारतीय संघात मोहम्मद अनास, पुवम्मा आणि अरोकिया राजीव यांचा समावेश होता. त्यामुळे आता या चारही भारताच्या धावपटूंना सुवर्णपदक दिले जाणार आहे.

याबाबत हिमाने एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये हिमाने सांगितलं की, ” काही दिवसांपूर्वीच मला आशिया चषक स्पर्धेचे ४ बाय ४०० मीटर मिक्स रिले स्पर्धेचे सुवर्णपदक मिळाले होते. हे सुवर्णपदक मी ‘कोरोना वॉरियर्स’ना समर्पित केले आहे. कारण सध्याच्या घडीला पोलिस, डॉक्टर्स आणि अन्य ‘कोरोना वॉरियर्स’ हे मोलाचे काम करत आहेत. कोरोनाच्या काळात लोकांना सुरक्षित कसे ठेवता येईल, हे ‘कोरोना वॉरियर्स’ पाहत आहेत. त्यामुळे हे सुवर्णपदक मी ‘कोरोना वॉरियर्स’ना समर्पित करत आहे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button