breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

दु:खद बातमी! बॉलिवूड अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन!

वयाच्या ६६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Satish Kaushik : बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी घेतला अखेरचा श्वास. दिल्लीत असताना ह्रद्यविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झालं. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली.

मला माहित आहे की, मृत्यू हेच सत्य आहे. पण हे मी माझा मित्र सतीश कौशिक बद्दल लिहीन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. ४५ वर्षांच्या मैत्रीचा असा अचानक अंत झाला. ओम शांती! असं ट्वीट अनुपम खेर यांनी केलं आहे.

सतीश चंद्र कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणामध्ये झाला. ते प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक होते. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी अनेक नाटकांमध्येही काम केलं आहे. १९८३ मध्ये त्यांनी जाने भी दो यारो या चित्रपटाद्वारे चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं.

सतीश कौशिक यांनी मिस्टर इंडिया, दीवाना मस्ताना, साजन चले ससुराल यांसह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. तसेच त्यांनी रूप की रानी चोरों का राजा, प्रेम, हम आपके दिल में रहते है आणि तेरे नाम यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button