breaking-newsक्रिडा

अमेरिकेतील २०२० च्या एफ-वन मोटार शर्यती रद्द

न्यूयॉर्क – २०२० च्या एफ-वन मोटार रेसिंग ग्रा प्रि हंगामातीलअमेरिकेत होणाऱ्या चार मोटार शर्यती कोरोना महामारी संकटामुळे रद्द करण्याचा निर्णय स्पर्धा आयोजिकांनी घेतला आहे.

एफ-वन ग्रा प्रि मोटार रेसिंग २०२० हंगामातील वेळापत्रक कोरोनामुळे पूर्ण कोलमडले आहे. एफ-वन रेसिंग क्षेत्रातील युरोपियन फेरीतील तीन शर्यती रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे इमोला आणि न्यूरबरग्रिंग येथील स्पर्धा यावर्षी घेतल्या जाणार नाहीत. एफ-वन रेसिंग फेडरेशनने कोरोना महामारीमुळे यापूर्वीच कॅनडा, टेक्सास, मेक्सिको आणि ब्राझील येथील शर्यती रद्द केल्या आहेत. आता २०२० एफ-वन वेळापत्रकातील एकूण ११ शर्यती रद्द करण्यात आल्या आहेत. चीनमधील शाघांय येथील होणारी एफ-वन मोटार शर्यत रद्द केली जाण्याची अपेक्षा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button